मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तूं एकु उदारु । तूं स्वधर्मी निष्टापरु ।
तुजसीम नाथी झुंजारु । यये पुरत्रयीं ॥६८॥
सभेमाजी तूं श्रेष्ठु । रणसंग्रामीं धीटु ।
न साहे त्रिनयना लोटु । तुझ्या पार्था ! ॥६९॥
मागें अथवा मुखावरी । तूतें जे वर्णिती क्षेत्री ।
तयां समस्ताम माझारी । श्रेष्ठ असतां ॥७०॥
अति लघुत्व पावसील । मग ते स्तुतिही निंदा मानैल ।
आणि निंदा ते येइळ । सहज वांटया ॥७१॥
पस्परांही अपहास । करिती जन एकमेकांस ।
तें तूं मानिसी उपहास । माझेचि म्हणौनि ॥७२॥
तेथें दुणावैल कोयु । वरवयाचाही संतापु ।
तंव तव तो आरोपु । खराचि होईल ॥७३॥
अओ, बहु जनें विटंबितां । कवणासि परजिजे पार्था ? ।
अगा पुढील चुकवावे  आतां । तरि शहाणेपण ॥७४॥
तें असों, गा पांडुनंदना । जयांची करितासि तूं करुणा ।
ते तुज पळालया अर्जुना । काय म्हणतील ? ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP