मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
भीमसेन पाहे द्दष्टी । तंव अंधकारें कोंदली सृष्टी ।
गुल्मलता वृक्षदाटी । तृणें मार्ग लक्षेना ॥
निशाचरी श्वापद पक्षी । थोर गर्जना करिती कक्षीं ।
ओळकंबलीं महावृक्षीं । अस्वलें आणि वाघुळें ॥
वनदेवता यक्षिणीपाळें । गुप्त होती एकसरां ॥
प्रेतगण श्मशानवासी । रूपें धरुनि भ्यासुरवेषीं ।
छळिती अशुचि मानवांसी । झोंबती मांस भक्षावया ॥
दिवाभितांचें घुंघाट । पिंगळिउयांचे किलकिलाट ।
भालू भुंकती सैराट । टिटवे थोर टिवटिवती ॥
चक्रवाकांचे आर्तस्वरीं । कुमुदीं भ्रमरांचें झंकारीं ।
मस्तकमणितेज -विखरीं । जीव आहारा शोधिती ॥
चारिया निघोनि निधानें । धगधगीत प्रकाशमानें ।
ईश्वरकृपेस्तव पूर्वपुण्यें । येवों म्हणती सभाग्या ।
असो, हे निशा दाटली काळी । जेवी काळपुरुषाची कांबळी ।
ब्रम्हांड देवतेवरी सगळी । पांघुरविली आप्तत्वें ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP