मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


देशोंदेशींचे नृपाळ । असगे मीनले सकळ ।
महारथिये निर्मळ । क्षात्रधर्मीं ॥१५५७॥
वडिलु  भीष्मु, गुरु द्रोणु । कौतुक जयाचे तो कर्णु ।
कौरवभारु आनु । मीनलाअ असतां ॥५८॥
युद्ध होईंल दारुण । ऐसें स्वर्गा आइकोन ।
कौतुक पाहों सुरगण । अंतरिक्ष ठेले ॥५९॥
ते देखती तूतें रुदतां । मागें पुढें अवलोकितां ।
युद्ध सांडूनि पळतां । काये म्हणतील ? ॥६०॥
अर्जुनु गेला रे गेला । आपुला प्राण रक्षिला ।
थोरु पुरुषार्थुं केला । पळोनि येणें ॥६१॥
देखोनि भीष्माचें बळ । अर्जुनें सांडिली चळवळ ।
मायिक आणिली कळवळ । मोहाची येणें ॥६२॥
सारथ्य तुझें केलें । तें लाजिरवाणें आम्हां झालें ।
साचचि भय ध्येलें । काय पां तुवां ? ॥६३॥
पळोनि येथें जाणें । तेथिचे राये राणे ।
मीनले संग्रामे येणें । देखिलें तिहीं ॥६४॥
मग तेथिंचे ते तूतें । निभ्रंसितील निरुतें ।
मग काय करिसील ? मागुतें । गेलें तें युद्ध ॥६५॥
मग लज्जा प्राणु देइजे । कां निर्लज्ज होऊनि जीजे ।
थोरांचिये न वाचजे । सभेप्रति ॥६६॥
दानीं स्वधर्मीं समरंगणीं । कां सभेमाजी सिंहासनीं ।
वर्णितां ख्याति वचनीं । ययां माजी ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP