मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


बोधोनि पांचाळ नरेश्वर । भेटवीं उपायनें अपार ।
धृष्टद्युम्नादि राजकुमार । एक एक गौरवीं ॥
जांबूनद दित्याभरणीं । शृंगारावी याज्ञसेनी ।
स्नुषासहित द्रुपदपत्नी । रत्नीं वसनीं पूजावी ॥
पृथेचिया चरणां नमन । स्नेहशद्वें शांतवन ।
करूनि माझें आशीर्वचन । पांचही पुत्रां सांगावें ॥
मज वृद्धातें प्रतिपाळावें । मागील कांहीं  नाठवावें ।
द्रौपदीसहित शीघ्र यावें । आपुलिया नगरातें ॥
त्रैलोक्यनाथ द्वारकापति । लक्ष्मीपति रुक्मिणीपति ।
निर्जरपति भक्तपति । रेवतीपती समवेत ॥
त्या कृष्णासी वारंवार । लोटांगणीं नमस्कार ।
निवेदूनि मधुर उत्तर । माझें तया सांगणें ॥
पांडव घेऊनि सांगातें । कृपेनें शीघ्र येइजे येथें ।
माझें वचन तो निश्वितें । न मोडी हें मी जाणे ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP