मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


कली म्हणे, ‘त्रिदशेश्वरा । जाणें दमयंती स्वयंवरा ।
तें आमुतें होय दारा । ऐसें करूं बहु यत्नीं’॥
इंद्र म्हणे, ‘निवडले सकळ । दमयंतीनें वरिला नळ ।
आतां तुमचा प्रयत्न विफल । वांझवृक्षासारिखा’ ॥
कली बोले प्रत्युत्तर । प्रत्यक्ष सोडूनि सुरेक्षर ।
दुमयंतीनें वरिला नळ नर । हा अन्याय मज वाटे ॥
अनुचित देखतां विशेषें । दंडन नाहीं केलें कैसें !’ ।
शक्र म्हणे,‘म्यां संतोषें । हें घडविलें आवडी ॥
दमयंती पातली शरण । म्यां होऊनि सुप्रसन्न ।
कृपेनें देऊनि दान । हें सुलग्न लाविलें ॥
यथायोग्य पुण्यवंता । हृदयशुद्ध शरणागता ।
इच्छिलें फळ तें न देतां । ईश्वरत्व केउतें ? ॥
नित्य स्मरे त्याचें य्होगक्षेम । जरी न वाहे पुरुषोत्तम ।
शरणगताचा न दवडी श्रम । तरी तो देव कासया ? ॥
न करूं दीनाचें रक्षण । तरी आमुतें देव म्हणे कोण ? ।
हा भाव नेणती अज्ञान । तुजसारिखे कलिपुरुषा’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP