मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांसि राजे । जयाच्या भयें व्यापिले देव लाजे ॥
सदाचार भंगे पळाली प्रतिष्ठा ?। प्रतिष्ठान त्या नाभिकारींत श्रेष्ठा ॥
रघुकुळ टिळकाचें नाम वाचे वसों दे ।
विषय रतिसुखाचा काम जीवीं नसीं दे ॥
मग तुज न लगे ती मुक्तिचिंता कराया ।
परमगति विमुक्ती आप लागे वराया ॥
सकरुण गुरुद्दष्टीं ग्रंथ संपूर्ण जाला ।
अगुण सहित संतीं पाहिजे गोड केला ॥
सुजनसमुह शंभू कोटि लिंगें न मौला ।
परम भणग दीनें वाहिला बेलपाला ॥
त्रैलौक्य लावण्यनगरी । शृंगारश्रीपर्वतभ्रमरी ।
साहित्यबाजलिंगाचे शिखरीं । विशाळ नदी नर्मंदा ॥
प्रमेय पोतें साचीं रंभा । विद्यामूलपीठ जगदंबा ।
चातुर्य सौभाग्याची शोभा । कुलस्वामिनी कवींची ॥
आतां कयेचें अन्नसत्र । घालीं विश्वामाजी पवित्र ।
तेथें स्वामिनी मी स्वतंत्र । पाइकी मात्र त्वां कीजे ॥
त्या कारुण्यवसंतवातें । मूढमानसशुष्कलते ।
स्फूर्तीचे पल्लव फुटलें, तेथें । कवित्व फळे फळभारें ॥
जो ऐश्वर्यैं न चढें मदा । दरिद्रें दीनत्वा न शिवे कदा ।
निंदी त्याची न करी निंदा । तो नारायण नररूपें ॥
कामक्रोधाच्या भूतसंचारीं । न चळे सुविचारपंचाक्षरी ।
परधनपरस्रीपासोनि दूरी । तो नारायण नररूपें ॥
परोत्कर्षे निर्वैर मनीं । समान बुद्धि मानापमानीं ।
दंभाचार सांडिला मनीं । तो नारायण नररूपें ॥
स्वधर्मकर्पूरगृहाआतौती । जिव्हालिंग प्रदीप्त वाती ।
रक्षूनि राहे सावध मती । तो नारायण नररूपें ॥
सज्जन श्रोत्रियां देखोनि नेत्रीं । जो गर्व स्वयेंचि दवडी दूरी ।
शीर्षैं वाट झाडी पुढारी । तो नारायण नररूपें ॥
हरिहरनामाचे जीवनीं । जिव्हा तळपे होवोनि मीनी ।
कुतर्क शिमग्यासमान मानी । तो नारायण नररूपें ।
येथील श्रोते हे परिसणें । तुमचें अवधान परीस तेणें ।
माझें वकवृत्व हें लोहगुणें । अमूल्य होईल कांचन ॥
मग जयाच्या कर्णभृषणा । योग्य होईल निश्चय जाणा ।
याळागीं तुम्हांतें पुन: पुन: । प्रणिपात साष्टांगीं ॥
धरवेना तें धरिलें मनीं । तें सिद्धी पाववा कृपा करुनी ।
कीं वानरां सेतुबंधनीं । सामर्थ्य देता रघुनाथ ॥
अंजळी वोढवी सिंधूदका । ब्रम्हांड उचलूं म्हणे अलिका ।
तुम्ही कराल तरी होय निका । तोच अगस्ती कीं शेष ॥
वेदशास्त्र स्मृति पुराणें । नाना इतिहास व्याकरणें ।
गाळूनि विचार रसायनें । द्वैपायनें कुशलचें ॥
सुरस सुंदरी पवित्र सृष्टी । पक्कान्नें निपजवूनि पाठीं ।
संस्कृतशब्द सुवर्णताटीं । श्रेष्ठां श्रेष्ठां वोगरिलीं ॥
तेंचि रसायन दुर्बलपणीं । महाराष्ट्र भाषारंभापर्णीं ।
वाढिलें तरी भुकाळू जनीं । न सेविजे किमर्थ ? ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP