भास्कर कवीश्वर
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
मोतियांचें घोष । कुकुंमरसें ।
तर्ही न एति करौं सरिसे । प्रबधें सी ॥
पातां प्रमेयाची गोडी । अमृता उपजे अनावडी ।
साकरेची कीजे कुरौंडी । कवितालतेसी ॥
वाणितां कान्हु चौहातु मल्लु । ओडओ होतसे नवलु ।
बोलु रसें दोंदिलु । नाचत दिसे ॥
वाणितां वनमाळी । शब्दसुखाची होये नव्हाळी ।
कवितां भली पाखाळी । सुंरग दिसे ॥
फुन वाचा रसाळां । गर्वू सांडवीन कोकिळां ।
कळहंसा अवकळा । करीन मी ॥
भणौनि शिशुपाळवधी कथा । जे भक्तिरसाची था ।
कीं सोनवै कैवल्यपथा । पाजळली ते ॥
ना ते मुक्तिवनितेची दूतिका । कीं ज्ञानांजनाची शलाका ।
कीं कैवल्यमंदिरींची पताका । झळकतुसे ॥
नातरी शांतिरसें सींपतां । सासीनली ज्ञानलता ।
कीं विवेकाची सौभाग्यदेवता । मूर्ति जाली ॥
कीं प्रबंधवसंतींची कोकिळा । जीवुचकोर संजीवनी चंद्रकळा ।
कीं निम्होळ संसारवाटेची विश्रामशाळा । आर्तजनांलागीं ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP