विठ्ठल चित्रकवि
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
देशपरत्वें प्राकृत लेणे ।
भूषणिं रत्नें द्योतत तेणें ॥
केवळ पद्मा भूभुजबाळा ।
शोभित कंठीं चंपकमाळा ॥२७॥
अंगुलीस नवरत्नमुद्रिका ।
शोभिवी नृपसुता वितंद्रिका ॥
भूषणें चरणिंचीं कलस्वरें ।
गर्जती मणियुतें घनस्वरें ॥२८॥
जांबूनद लेणीं ल्याली हरिणाक्षी ।
व्यंजत्स्तन दोनी बिंबाधर साक्षी ॥
शोभ मदनाची माता नृपबाला ।
हारावलि कंठीं मध्यें मणिमाला ॥२९॥
मुद राखडी प्रभुत मंडित वेणी ।
उभि राहिली जडित लेउनि लेणी ॥
करकंकणादि रशना विहारिणी ।
नृपनंदिनी मधुर मंजुळवाणी ॥३०॥
अनंग जाळिला भवें मग स्वभूसि वैभवें ।
सुतप्रदान शांभवें दिलें तया मनोभवें ॥
शरासनीं स्वसंभवें क्षुर प्रयोजिलें जवें ।
प्रपंचचामरा जवें विजीति दूत लाघवें ॥३१॥
भिल्लीमागें लागला शूळपाणी ।
वृंदाकामें व्यापिला चक्रपाणी ॥
रंघ्रें देहीं लाधला वज्रपाणी ।
ऐसा योद्ध पुष्पकोदंडपाणी ॥३२॥
स्मरशरें मिनले परिसा रथी ।
गजतुरंगम यापरि सारथी ॥
मदनमूर्च्छित ते जगतीतळीं ।
अजपरात्पर तेज गती तळीं ॥३३॥
तुरें शंख भेरी नफेर्या तुसारे ।
बळें गर्जती वाजवीतो तुतारे ॥
दिशाचक्र धूमांधकारें दिसेना ।
भ्रमें भ्रांत निभ्रांत चैद्यादि सेना ॥३४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP