मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


आनंदतनय अरणीकर शोभवि फार कवन यमकांहीं
तत्सूक्ति पाठ ज्याला त्याचें पाहे न भवन यम कांहीं ॥

गोपी गोपाळ गाई पडुनि महितळीं शद्धती तैं अगाईं ।
ऐशी राया नवाई जनिं वनीं पसरे राक्षसीची अवाई ॥

तों हांसे शेषशायी भवतपनतपाकांतसंतोषदायी ।
त्या कृष्णाचेच पायीं नमन करितसे आरणीचा शिपाई ॥

‘ विधिसहि दुर्लभ जें तें आलिंगन वात नंदना दे हा ।
गाती पुरातन यती या कपिच्या विहित नंदना देहा ॥’

कीं ऐसा दुबळा तयासि अबळा मागे चिरें कांबळा ।
बाळाच्या कवळानिमित्त कबळा विस्तारूनियां बळा ॥

ते बोले प्रबळागती चळबळा चर्चा करी पाबळा ।
कां जानात बळानुजाप्रति बळारातीस जो दे बळा ॥
नुस्ता पोरवडा घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा ।
नाहीं भात वडा तया दहिंवडा कैंचा ग ! तो जीवडा ॥
दारिद्यें चिवडाचि सर्व दवडा थोरीवडापावडा ।
मागा तो यदुरावडा गयवडा नाशील त्या आवडा ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP