मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
परिघ पौळिया गृह गोपुरें । सौधें शतखणी दामोदरें ।
मध्यें तळघरें उपरिकाकारें । पडशाळा देहलिका ॥
गगनचुंबी विशाळ हुडे । वर्तुळ पर्वताचेनि पाडें ।
द्वारीं कनक कपाट जोडे । गर्जतां छळिती वैरिया ॥
लाज सांडोनियां क्षिती । मेघाआड अमरावती ।
लपाली, आणि भोगावती । पातळगर्ते निघाली ॥
पश्चात्ताप धरूनि चित्तीं । कुबेराची अलकावती ।
कैलासवनामाजीं वस्ती । करूनि बैसे वैराग्यें ॥
उपवनें अवलोकितां नयनीं । लज्जा दाटलीं नंदनवनीं ।
सेवूनि मंदाकिनीचें पाणी । तपश्चर्या आचरे ॥
वापी कूप सरोवरें । अमृतस्वादु सरिता नीरें ।
अनेक रंगाचीं कल्हारें । विकासलीं घमघमिती ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP