मालो
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
चांगला विठोबाचि मनीं चांगली रखुमाई ।
मुक्तीचें माहेर माझी पंढरीची आई ॥१॥
चांगलें पद्माळें वर तुलशीचें वन ।
चांगला वेणुनाद तेथें विसाविलें मन ॥२॥
चांगले हे चंद्रभागेमध्यें वसे पुंडलीक ।
चांगलें हें वाळुवंट मिळती सनकादिक ॥३॥
चांगला हा चौक बरवें विठोबाचें घर ।
म्हणे मालो आलों धालों आनंदें निर्भर ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP