मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित नारायण व्यास बहाळिये

पंडित नारायण व्यास बहाळिये

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तेथें उंचपणें कळसीं । स्पर्श कीजेत आकाशीं ।
देखे चातुर्दक्ष तैसीं । सुराळयें ॥
साखाळाचिया उंचिया । पांता द्दष्टि टांचिया ।
जालिया बुद्धि सौचिया । ते रचना पांता ॥
कीं प्रासांदाचेनि मिषें । आकाशा मांच बांधले जैसे ।
द्दष्टी ओळघताति सायासें । जरि अंत लाहातिना ॥
कीं प्रासाद मेरू । वरी कळस पूर्णचंद्रु ।
तैं शारदि देवेंद्रु । क्रीडा करी ॥
कीं देवतावरि । प्रासाद छत्र धरी ।
ओळगताति ऋद्धिपुरीं । देवरायातें ॥
ऐसीं नगरमंडितें देऊळें । देखे गोक्षीर धाम धवळारें ।
ना तिए जालीं उजळे । द्दष्टीवेनि ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP