मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


हरिपदिं लागा मागा धनधान्यचिरें ।
सुरवरदायकांहीं न पवे अचिरें ॥ध्रु०॥
मारमनोज्ञ उदार दयानिधि द्वारवतीचा राजा । द्विजदेव भला ।
येईल तुमया काजा कळलें मजला ।
संशय न म्हणा जा जा सुमुहूर्त चला ॥१॥

बाळपणी जगपाळ गडी तुम्हिं होऊनि लिहितां साळे । बहु खेळतसां ।
ते खुण बोला भाळेप्रभु तो सहसा ।
कां धरूनी जपमाळे उगलेचि बसा ॥२॥
आनंदात्मज आदिगुरु हरि आदर करितां कांहीं । मग काय उणें ।
वाद नको भय नाहीं लौकीक गुणें ।
हा धरितां पथ पाहीं सुख होय दुणें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP