विसोबा खेचर
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।
तेथ जरी कीं माझे । विहिती हन ॥८८॥
म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेलावा ।
करूनि त्यंचिया गांवा । धांवतु आलों ॥८९॥
नामचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं ।
सजूनिया संसारी । तारूं जाहलों ॥९०॥
सडे जे देखिले । ते घ्यानकासे लाविले ।
परिग्रही घातले । तरियावरी ॥९१॥
प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं ।
मग आणिले तटीं । सायुज्यांचिया ॥९२॥
परि भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे ।
वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥९३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP