मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
सरस्वती गंगाधर

सरस्वती गंगाधर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“आकांत करी ते नारी । लोळतसे धरणीवरी ॥
भोंसकोनि ध्यावया घेतां सुरी । वारिती मग जनलोक ॥
आफळी शिर भूमीसी । हाणी ऊर पाषाणेसीं ॥
केअ मोकळे आक्रोशीं । प्रलापितसे ते नारी ॥
उष्णकाळीं तापोनि तरु । ठाकोनि जाय छायातरु ।
वृक्षचि पडे घात थोरू । त्यापरी झालें मज ॥
व्याघ्रभयें पळे धेनु । जाय आधार म्हणोनु ।
तेथें वधीतसे यवनु । तयापरी झालें मज ॥
ऐसी मी पापीण दैवहीन । आपुल्या पतीचा घेतला प्राण ।
मातापितयांसी त्यजून । घेऊन आल्यें विदेशीं ॥
बाळपणीं गौरीसी । पूजा केली शंकरासी ।
विवाह होतां परियेसी । मंगळागौरी पूजिली ॥
चुडे कंकणाचे आशेनी । पूजा केली म्यां भवानी ।
सांगती मातें सुवासिनी । तीं तीं व्रतें केलीं म्यां ॥
केंवी राहूं आतां आपण । पति होता माझा प्राण ।
लोकांसारिखा नव्हे जाण । प्राणेस्व्र परियेसा” ॥
आलिंगुनी प्रेतासी । रुदन करी बहुवसीं ।
आठवी आपुल्या पूर्वदिवशीं । पूर्वस्नेह तये वेळीं ॥
“कधीं नव्हे वृथक शयन । वामहस्त उसेविण ।
आतां फुटलें अंत:करण । केंवी वांचूं प्राणेश्वरा ॥
तव प्रेम होतें भरलें । मातापितयांतें विसरल्यें ।
त्यांचा गृहीं नाहीं गेल्यें । बोलावणीं नित्य येती ॥
जोंवरी होतासी तूं छत्र । तंव सर्वां ठायीं मी पवित्र ।
मानिती सकल इष्ठमित्र । आतां निंदा करितील ॥
सासूश्वशुरापाशीं जाण । माझें मुख पाहतां मरण ।
गृह जाहलें वो अरण्य । तुम्हांवीण प्राणेश्वरा ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP