मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तो बोलला वचन चंद्रकले सुशीले ।
जाली तुला सकळ व्युत्पति राजबाळे ॥
नाहीं तुला शिकविलें स्मरशास्त्र पाहीं ।
अभ्यासितां विदित होइल सर्व तेंही ॥१॥

ते बोलतां परम सद्रद मंद वाचे ।
पादारविंद धरिलें कवि बिल्हणाचें ॥
तें कामशास्त्र तुमचेनि मुखें वदावें ।
त्यानंतरें स्वनगराप्रति शीघ्र जावें ॥२॥

शोभें निकें तनु तिचें महकें सुगंधें ।
कर्पूरधूपमणिमंडीत पाचबंधें ॥
शृंगारिलें लखलखाट दिसे दिगंतीं ।
सौदामिनी लवत तेज पदे दिगंतीं ॥३॥

शृंगारकानन गमे निज मन्मथाचें ।
देखोनि चित्त रमलें कवि बिल्हणाचें ॥
आमंत्रिला त्वरित मन्मथ तो शरीरीं ।
आरंभिलें ‘रतिरहस्य’ म्हणे विचारीं ॥४॥

नानासनें नयनवर्तन हास्यगोष्टी ।
कंदर्पसिंधु विपरीत कला प्रतिष्ठी ॥
हें सांगतां परम व्याकुळ कामबाणें ।
जाली म्हणे विविध शास्त्र विधिप्रमाणें ॥५॥

हें देखुनी खवळलें मन आवरेना ।
होणार जाण सहसा लिहिलें टळेना ॥
दैवी कळाघटित तेंच विचारिलेंसे ।
गांधर्व लग्न सदनीं मग लाविलेंसे ॥६॥

यानंतरें खचित रत्नपलंग सेजे ।
क्रीडा करी प्रथम कामसुखासि लाजे ॥
आलिंगनीं द्दढ तिला धरितांच झाडी ।
संघट्टनीं बहुत मी परि मी न सोडीं ॥७॥

तल्पीं सुगंध सुमनें मणिरत्नमंचीं ।
क्रीडा कुतूहल करी तनया नृपाची ॥८॥

पद्मानना बहुत भी मृगशावकाक्षी ।
मातंगकुंभयुगुलस्तनभार साक्षी ॥
रक्तप्रवालरुचिराधरबिंबशोभा ।
कुंदोपमा दशनपंक्ति हिरावली भा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP