दासोपंत ओंव्या
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
ते पर्वतच आनंदवन । सलोकतादि तेथील वृक्ष जाण ।
त्यांचें साउलीं योगीजन । विश्रामती योगबळें. ॥१॥
सद्भक्तीच्या अनेक लता । श्रद्धेची पुष्पें सुगंधता ।
बोधवारा सुटतां । निर्विकार आमोद दुमदुमी ॥२॥
तेथील माळी तो विवेक । आळें बांधून वृत्ति अनेक ।
त्यामाजीं फिरवितां निर्मंलोदक । मोड फुटती विचारांचे ॥३॥
स्थळोस्थळीं वैराग्य कारंजा मनोहर । शांतिजळ उडतसे इंद्रियद्वारा ।
सद्धासना दुर्वाकुर । शोभती त्याच्या समंतात ॥४॥
अक्रोध कृपीं सोज्वळ । पूर्ण भरलें अलोभ जळ ।
त्यांत शोभती सद्भावकमळ । अर्पणास्तव श्रीदेशिका ॥५॥
तेथील स्वानंद वृक्षांवरी । मुमुक्षुपक्षी निरंतरीं ।
सुशद्ध करिती अद्वयस्वरीं । आल्हादेंसी सर्वस्व ॥६॥
त्या वनींचें ब्रम्हाफळ । इंद्रियांस करुन वेगळ ।
सेवून गुरुभक्त केवळ । अजरामर पैं होती ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP