मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विसोबा खेचर

विसोबा खेचर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


साधु विसोबा । खेचर राखे चरणानतासि सुज्ञानें ।
केला कृतकृत्य क्षणमात्रें ज्या नामदेव सुज्ञानें ॥

तो देव नामया हृदयीं दाविला । खेचरानें केला उपकारु हा ।
अवघी सत्ता आली हाता । नामयाचा खेचर दाता ॥

आधीं चैतन्य आपैतें करोनी । मग संचरें तारुण्यानीं ।
कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥
तुजपाठीं कवण धांवे । कवण टाकी कवण पावे ।
कामक्रोधें जग मोहावें । कासयासी खोववी पोटीं पाय ॥२॥
मायामोहजाळ तुटेल । पळेल पां काळवेळ ।
कां रे स्मरसी ना गोपाळ । मिथ्या व्याकूळ काजेंवीण ॥३॥
वैराग्यें द्दढ होईं निरुता । कासया मितोसी चपेटघाता ।
परस्त्री तितुकी मानी माता । विषयनिमित्ता आल्यासाठीं ॥४॥
धर्माचेइ मागें रिघाला कर्ण । शिबी चक्रवर्ती जाला जीवित्वहीन ।
तयामाजी सांग नाडला कोण । लटकी झकपण कां बोलती ॥५॥
इंद्रियां गोड तें आरोगिजे । मग धणीवरी धावा पोखरिजे ।
काय सांगूं शहाणपण तुझें । खेचर विसा म्हणे अरे नामया ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP