मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
नागेश कवि

नागेश कवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तोडबंद अति सुंदर भासे ।
त्यावरी अरुण बस्र विकासे ॥
आदरें करूनियां मग बाळी ।
लेतसे बहुत सुंदर चोळी ॥३१॥
घातली सखिजनीं मग वेणी ।
लेइलीं अति मनोहर लेणीं ॥
काय वर्णन करूं, अति शोभे ।
देखतांच मुनिचें मन लोभे ॥३२॥
वेणी त्रिवेणीसम भासताहे ।
याकारणें ते त्रिगुणात्म पाहे ॥
आधीं फरा कतकिपत्र साजे ।
त्यानंतरें राखडि ते विराजे ॥३३॥
गंगावनीं गुंफित फार लेणीं ।
श्रोणीतटीं चुंबित रम्य वेणी ॥
भासे जशी श्यामल सर्पिणी ते ।
दंशावया कृष्ण वनासि जाते ॥३७॥
जडित कनकमाळा मोतियांचीच जाळी ।
तरुणजनमनातें देखतां फार जाळी ॥
तदुपरि कडदोरा शोभतो मध्यदेशीं ।
जर कमर झणाणी नाद तो किंकिणीसी ॥३८॥
बाहु बहू शोभति बाजुबंदीं ।
त्या तोळबंडया अति रम्य रुंदी ॥
वांके चुडे कंगणियांसि घाली ।
त्या आंवळयांचे सर थोर ल्याली ॥३९॥
सकंकणें पाटलिया सुवाळे ।
दोरे जवे हातसरा निराळे ॥
कांचेचिया बांगडिया सुरंगा ।
स्थळीं स्थळी शोभति दुरंगा ॥४०॥
ल्याली कसी आणिक रम्य भूषा ।
तांबूल शोभा वदनीं विशेषा ॥
करीं धरुनी मुकुरासि लक्षी ।
ते लेतसे अंजन खंजनाक्षी ॥४१॥
चंद्राबळी मानसमोहना ते ।
मानें गुमानें मथुरेसि जाते ॥
तिच्यापुढें काय करील रंभा ।
जंभारिनारी न करील दंभा ॥४२॥
भ्रम करी प्रकरीपरि चंचला ।
मन हरी न हरी अशि कोकिला ॥४३॥
रसरसी सरसीरुहलोचनी ।
गजगमा जसि मानसमोहनी ॥
स्तनभरे नभ रे उचलीतसे ।
निजधनें जघनें भुलवीतसे ॥४४॥
सुददनाददनासि विलोकितां ।
जनमनीं नमनीं मग शांतता ॥
कमळ कोमळ गंध मनोहरी ।
भ्रमर भोंवति गुंजति त्यावरी ॥४५॥
कमळ कोमळ गंध मनोहरी ।
भ्रमर भोंवति गुंजति त्यावरी ॥७५॥
चतुर सादर ते अवलोकिली ।
सुरजनीं रजनीशमुखी भली ॥४६॥
चंद्रावळी चंद्रमुखी सुकेशी ।
देवांगनामाजि जशी सुकेशी ॥
नेत्रें करी भजन खंजनाचें ।
मोठें मनोरंजन तें जनांचें ॥७५॥
भ्रमकरें दशधा विधु काचला ।
नखमिसें चरणीं मग वांचला ॥
दिधलि सोडुनि ते निजशुभ्रता ।
चरणिं सेवितसेच सुरक्तता ॥७६॥
मृदुल उंच नखीं उपमा नसे ।
सकळ माणिकरंग फिका दिसे ॥
सुनख अंगुळियांवरि शोभती ।
उरग पंचफणापरि भासती ॥७७॥
किंवा गमे पंचशरें जगातें ।
जिंकोनियां ठेवियलें शरातें ॥
कीं पादपद्मींहुनि पंचगंगा ।
निघालिया भासति त्या सुरंगा ॥७९॥
सरस पाउल - रंग विराजतो ।
तदनु बाळरवी मग लाजतो ॥
पदरुहीं सरसीरुह जिंकिलें ।
म्हणवुनीं कमळीं जळ सेविलें ॥८०॥
सरळ अंगुळि देखत साजते ।
कमळताळ चळाचळ कांपते ॥
अरुण पाउल - रंग विलोकिला ।
अरुणही पळतां मग खंजला ॥८१॥
घोटीं तिचीं वर्तुल रम्य भारी ।
स्थिरावले कीं पुरुषार्थं चारी ॥
निर्लोभ त्या पोटरिया सुरेखा ।
सुवर्णवर्णि कमनीय देखा ॥८३॥
विमळवर्तुळ जानु विराजल्या ।
कनकदंड तशा उरु चांगल्या ॥
कदळिची उपमा उरुतें नसे ।
बहुत शीतळ ते कदळी वसे ॥८४॥
किंवा नवी नवरसां उतरावयाची ।
ते कूपिका मज गमे स्मरवैद्यकींची ॥
किंवा गमे मदनमोहनयंत्र आलें ।
त्याच्या बळें सकळही जग वश्य झालें ॥८९॥
नितंबबिंब प्रभुच्य भयानें ।
संकीर्ण तो मध्यम देश जाणें ॥
महाभयें क्षीण विशेष झाला ।
स्वगौरवालागिं भुलोनि गेला ॥९४॥
शिशुत्वसंराज्य बुडोनि गेलें ।
मध्यांग देशांतरिं दैन्य आलें ॥
किंवा कुचांनीं परचक्र केलें ।
गुरुच मध्येंच लुटोनि नेलें ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP