मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
बन्धातीत अये स्वतन्त्रहृद...

तुटलेले दुवे - बन्धातीत अये स्वतन्त्रहृद...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


बन्धातीत अये स्वतन्त्रहृदये, हो त्वत्प्रभा मन्द न
अन्धारांतिल कोठडींत तर ती अत्यन्त हो ऊज्ज्वल
की वास्तव्य तुझें तिथे घडतसे त्याच्या हृदीं केवळ
प्रीतीचेंच तुझ्या जया, न दुसरें, बान्धूं शके बन्धन.
बेडया घालुनिया सुतांस तुझिया कारागृहीं कोण्डिती
नान्दे कोन्दट ओल ज्या तळघरी. जेथे सदा दुर्दिन -
त्यांच्या आत्मनिवेदनें जय मिळे देशास मागाहुन
वातारूढ दहा दिशांत विहरे तैं मुक्तिची कीर्ति ती.
हें कारागृह शोककारक कसें ? हें तीर्थ कीं आपुलें !
पावित्र्यें जणु यज्ञवेदिच गमे ही भूमि मातें अहा !
मातीच्याच भुऊपरी झिजुनि हे पाषाण गेले पहा,
येथे चालुनि बन्दि तो ऊमटलीं त्याचींच हीं पाऊलें.
कोणीही न पुसो खुणा, पिळवटे ज्या पाहतां आंतडें,
लेखी ही जुलमाविरुद्ध दिसते फिर्याद देवाकडे.

२५ जुलै १९१९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP