शुभ्र, श्यामल, पीत, ताम्बुस गिरी नीलाम्बरीं पाङगले !
आग्नेयीस सुवर्णदुर्ग, अलका प्राचीन, लडकाच वा,
कैसें ऊन्नत सूर्यपान झळके, ऐत्क्षेप किंवा नवा,
रथ्या सर्प गमे, गढूळ भवती हीं साचलीं पल्वलें.
आम्बे तृप्त सतेज, मात्र गळती लागे अता मोहरा,
ओल्या कुन्द हवेंत सौरभसुखोच्छवासास हे सोडिती,
झाडींतून नदी लपूनि छपुनी वाहात सर्पाकृती
दावी ती सखिसङगमोत्तर दुरी आदर्शवत चेहरा.
व्यापी शान्ति, ऊदास शान्ति अपणां, आभाळ हें फाटलें,
स्थानीं ऊच्च अशा चढूनि सगळा ऊत्साह कां मावळे ?
वारा पार पडे, न शब्द वदवे की जीव त्याचा गळे;
तूही शान्त अबोल, काय न कळे चित्तीं तुझ्या साठलें.
रङगे अम्बर हें पहा, मन कशासाठी तरी आतुरे -
आला सम्पत दीस, बोल मधुरे, झाला अबोला पुरे,
११ मार्च १९२३