मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
डावी घालुनि हा कडा हळुहळू...

तुटलेले दुवे - डावी घालुनि हा कडा हळुहळू...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


डावी घालुनि हा कडा हळुहळू छातीवरी घेऊनी
येतों नीट घळीमधूनि चढुनी त्या विन्चुकाठयावरी,
गेले तें कुळ - गाव दूर अमुचें झाडीमधे लोपुनी,
त्वच्छायाकृति दीसते ऊमटली तेज:पटीं अम्बरीं.
अन्तश्चक्षुपुढे छबी पण तुझी रङगीत ही शोभते
त्वत्पर्युत्सुक आननीं टवटवी ताम्बूस खेळे नवी;
घेशी नीट शिरावरून पदरा दांतीं, ऊडे ठोक तें,
द्दष्टी निश्चल टेकडयांबर भुर्‍या, टेकावया ये रवी.
वाद्यें मङगल वाज्तात गमतें येती दुरूनी ध्वनी,
घारींच्या तरण्याकडेच मन कां सारें तुझें लागलें ?
फेकूनी वर माळ वाहुनि तुझ्या पायीं रिघावें झणी
जिङकायास भयाण दक्षिणदिशा आता अनीहाबलें.
कोमेजूं बघ लागलीं वनफुलें, - सूर्या, जरा थाम्ब रे !
काळोखाविण किर्र या संबगडी कां अन्य आता बरें ?

१ मार्च १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP