मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
“रे श्रीकान्त पहा पहा ! त...

तुटलेले दुवे - “रे श्रीकान्त पहा पहा ! त...

सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.


“रे श्रीकान्त पहा पहा ! तुळशिला घाली शुभाङगी जळ,
प्रार्थी जोडुनि हात, नेत्र मिटुनी राहे ऊभी निश्वळ.
माथें नम्र पहा नि ओठ हृलते, हा भाव भोळा खरा !”-
“मूर्खा, नाटक सर्व ! धर्म कुठला माशूक या पाखरा ?
चोळी आखुड, ऊर अर्धऊघडा. गोरा गळा मोकळा;
दावी चोपिव शुभ्र पातळ हिचा बान्धा ऊभा कोवळा;
काळे केस फुगीर दाट. मधला सीमन्त गोरा सिधा, -
मर्दा, कोण न चान्दणीवर अशा रे व्हावयाचा फिदा ?”
“यांचे जे यजमान त्यांप्रति कुणी का रे असे लक्षिना ?
का ते धार्मिक अर्पिती बहुत की विद्वद्भटां दक्षिणा ?
ही तों स्नान करी नि ऐक तुळशी भावें पुजी प्रत्यहीं,
ओव्या चार म्हणे, तयांतच बघे धर्मांतलें सत्य ही.
- भृङगा, तू रसिक कृतन्घ दिसशी ! बा पडकजा सुन्दर,
भक्तीचा प्रभु चाहता, तुजशि तो देऊल का अन्तर ?”

२ जून १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP