तुटलेले दुवे - सोसूं कोठवरी वियोग तव मी ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
सोसूं कोठवरी वियोग तव मी ? ये पाप माझ्या मनीं
रागद्दष्टिपुढे तुज्या नच शके राहूं ऊभें जें मुळीं;
काही कृत्य करूनि भीषण गमे जावें मरूनी झणी,
पाडावेंच ऊजाड देऊळ जरी देवी न ये देऊळी.
होतो मानित सौख्य सुन्दर तुझ्या हस्ताक्षरा देखुनी
गेले मास किती निघूनि, अजुनी सन्देश ये ना कसा ?
सम्पेना वनवास हाय ! वर हा ऐकान्त वाटे खुनी,
चित्तीं त्वत्स्मृति राहुनी सुख नसे, मूर्ती कुठे राजसा !
डोकें जाऊ भणाणुनी रुधिर हें तापें शरीरांतलें,
तो व्दान्तकषाय लागुं न पडे वृत्तीस ऊत्कण्ठिता;
ये गे धावत, मार घट्ट विळखा कस्तूरिका - कुन्तले,
गोष्टी साङग निरर्थ गोड अपुल्या - ती आपुली संहिता.
झालें प्रेम जिवास तीव्र चटका लावूनिया पारखें -
हे पुष्पाङगि, सतेज तू, मन् तुझें कां गे हिर्यासारखें ?
२३ फेब्रुवारी १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP