तुटलेले दुवे - या लोकीं यशवन्त तोच कवि क...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
या लोकीं यशवन्त तोच कवि की प्रेमाळ यद्वाक्सुधा
कण्ठांतूनि तुझ्या सुरेल निघतां रङगूनि जाऊ सभा;
होतां तींत निमग्न पार शमती नाना मनींच्या क्षुधा,
तन्द्री लागुनि ऊल्लसे चहुकडे काव्यात्मतेची प्रभा.
अर्धोन्मीलित लोचनांस दिसते मूर्ती तुझी गायिके,
अर्धोन्मीलित अन्तरीं दुमदुमे ऊन्मत्त तूझा स्वर -
अर्थाचा न करींच शोध तरिही तत्त्वास मी आऊकें,
सारें सुन्दर आणि मङगल दिसे, काही नसे नश्वर.
होऊ खण्डित गायनौघ तव तों - अन जाणवे स्तब्धता,
येती मागुनि अन्त्रांतुनि हळू तेव्हा ऊसासे किती !
जागी हो हुरहूर ती, कुणिकडे हो लुप्त विश्रब्धता ?
वाटे नन्दन, कल्पनीयच जरी खेंवीं धरीं तें क्षिती.
व्हाया धन्य मदीय शब्द कविता कण्ठांत तूझ्या फिरो,
देवी, दिव्य समागमीं कवन हें अतृप्ततेचें विरो.
८ मार्च १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP