तुटलेले दुवे - आणी मध्यनिशेस जागृति मला ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
आणी मध्यनिशेस जागृति मला तूझी स्मृती उत्कट,
कोठे तू असशी जुन्या संवगडया, कोठे अता कष्टशी ?
अन्धारीं मम जीव हा हुरहुरे बाल्यांतुनी गुङगत,
राहे गोड विषन्णताच हृदया वेढूनि अस्पष्टशी.
पक्षी मी असतों तरी ऊडुनि मी भेटीस येतों झणी,
शाळेंतूनि तुझ्यासवें फिरूनि मी गोष्टी जुन्या साङगतों,
तेथे ओळखिच्या जुन्या कितितरी गोष्टींचिया शोधनीं
कोणीही जरि ओळखी न अपणां, नादांत त्या रङगतों.
ऊकायास तिथेच आतुर असें मी कोकिळेचा स्वर,
वेडावूनि तयास वाढवितसूं त्याची तदा आर्तता;
वाटे मात पुन्हा करूं कडक त्या रामा शिपायावर,
अन सम्भावित बन्धनापलिकडे खेळूं, करूं आर्पता.
मित्रा, येऊनि सर्व हें करिन मी, स्थानींच शाळा असे,
कोठे तू पण ? बाल्यवेडहि तसें तूनें असे वा नसे ?
३० जुलै १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP