मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
तेव्हा काय अवर्णनीय मजला ...

तुटलेले दुवे - तेव्हा काय अवर्णनीय मजला ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तेव्हा काय अवर्णनीय मजला अस्वस्थता लाभली
प्रेमाची हृदयास होय सहसा जैं गोड संवेदना !
जाऊ जीव अतीन्द्रियांत अडुनी - तेथे कशाचा कली ?
चित्तीं शाश्वत तत्त्व तें प्रकटतां स्वर्भूमघे भेद ना.
सारी ती अनुभूति निस्तुल अशी जुन्मत्त रम्यादभुत -
घ्यावी ती मज वाटते पुनरपी जन्मास या येऊनी -
आता स्वप्नच वाटतें जरि तदा प्यालों गमे अमृत,
सत्य सृष्टि पटे परी मज किती निस्सार वाटे ऐणी !
नाही पालटलें अजूनिहि सखे माझें जुनें प्रेम तें.
नाही वाटत गे परन्तु मज तें याच्यापुढे शाश्वत;
माझे हें मन तूझिया प्रकट या रूपावरी वेधतें,
डोळ्यांना नच जाणवे, हळु असा हो त्यामधे पालट.
मातीआ मिळवून टाकिल यदा दोघांस तो अन्तक
प्रेमाची पुढतीच गोष्ट, अपुली राहील का ओळख ?

१९ डिसेम्बर १९३७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP