तुटलेले दुवे - वाटे स्वास्थ्य न येथ, जाऊ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वाटे स्वास्थ्य न येथ, जाऊं म्हणशी जा थण्ड देशास तू,
सन्धी ये अनुकूल, आणिक हवा तूतें हवाफेर तो.
जा, वाटेल मला जरी कठिण तें गेल्यास ऊल्लास तू.
जाशी तू कविताद्युती मग पडे अन्धार चौफेर तो.
माझ्यासाठि रहा ऊथेच तुजला ऊसें म्हणूं मी कसें ?
घालूं माळ कशी बळें अडकवूं बेडीवजा शृडखला ?
तू घेशील तिथे नवीन पदवी अत्युच्च, येथे नसे;
जा जाशी तर तू, असे मजसवें तूझी स्मृती मङगला.
वेडा तू म्हण, वाटतें परि मला काही तरी कां भय ?
हें तूझें मधुखिन्न हास्य न शके माझी करूं खातरी,
पत्राने तव ‘काम’ - पूल जवळी आहेच निस्संशय,
येऊं मी ? अधनास काय भलती ही हाय ऊच्छा तरी ?
हा अन्त्यक्षण चालला फिरविशी तू त्रासुनी कां मुख ?
हा प्रीत्युत्कट भाव का तुज गमे वा ग्राम्य वा कामुक ?
१७ ऑक्टोबर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP