तुटलेले दुवे - आशान्तक्षण दूर दूरच असो त...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
आशान्तक्षण दूर दूरच असो तो माझियापासुनी
यासाठीच मनांतलें गुपित मी नाही तुला साङगत:
राहो प्रीति मुकीच. अल्प नच हें की अल्प तू हासुनी
शालीन्यें वर पाहतां न करिशी माझें मुकें स्वागत.
गौरी होतिस तू यदा प्रथम मीं मूर्ती तुझी पाहिली,
अन ये रम्य अबोधपूर्व हृदयीं काहीतरी भावना,
पाकोळीपरि कल्पना ऊडत त्या लाटांवरी राहिली.
राहीं वाट पहात मी परि तुझा लागे मुळी ठाव ना.
द्दष्टी रोखुनि अर्थपूर्ण बघतों मी अन्तरें कातर,
तू अद्यापि कळीच का ? न बघशी आयुर्वसन्तासही ?
कैसा दिव्य असेल मादक ऊथे सौगन्ध तो आन्तर,
यावी ऐक तरी कधी झुळुक ती माझ्याकडे, आस ही.
आऊ क्षीणच होत आस, कर तू वेळींच बाले, दया.
तो मृत्युञ्जय गन्ध सोड अपुल्या तोण्डांतुनी मूक या.
५ ऑगस्ट १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP