तुटलेले दुवे - का नाहीतच सुस्वरूप तुझिया...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
का नाहीतच सुस्वरूप तुझियाहूनी स्त्रिया भूवरी ?
का आहेतच सर्वही विमुख त्या ? जों तू दुरी ठेविशी
तों तेडेपण हें पहा हृदिं जसें क्षारत्व सिन्धूदकीं,
साहूनी अपमान खोल हृदयीं ही प्रीति वाढे पिशी.
होतां पेठुनि खाण - तेल भडका, पाणी जरी शिम्पिलें
तें पाण्यावरती तरङगुनि जळे, ज्वाला बसेना, कुठे;
जैसा दीप विझे तसा न वणवा वा सूर्य झञ्झानिलें;
बोले भानु, “कितीहिइ तोण्ड फिरवो पृथ्वी, न कक्षा सुटे.”
येथे मीच शशीसमान घिरठया घालीं तुझ्या भोवती,
अन्तर्व्याधिमुळेच लागति मनीं आशेस नाना कळा;
अन पुष्पांस अनेक चुम्बित अली वार्यावरी पोहती
लाभे त्यांस ‘रसज्ञ’ थोर पदवी - वा न्याय हा आगळा !
तू डोळे भलतीकडे फिरवुनी मर्मास या भेदिशी,
हे पुष्पाङिग ,रसज्ञ मार्मिकच तू, कां रक्त माझें पिशी ?
२० जुलै १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP