तुटलेले दुवे - मूर्ती भव्य गंभीर शान्त त...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
मूर्ती भव्य गंभीर शान्त तुमची दे दर्शनें शान्तता,
कैलासासम तीर्थरूपच तुम्ही जीवास या वाटतां;
वन्दायास तुम्हांस हात जुळती, वाकूनि टेके शिर,
सारा आदर दाट साठुनि गळे डोळ्यांतुनी बाहिर.
या डोळ्यांतुनि सौग्य शौर्य विलसे, नान्दे तितिक्षा तशी,
राही प्रेमळ धूर्तता अनघ जी केव्हा पडेना फशीं,
हें औदार्य खुले विशाल निटिलीं, त्रस्तांस दे आसरा.
दुष्टांना पिळदार यष्टि सुचती, वेळींच मागें सरा.
मोठे दुर्गम दुर्ग सहयगिरिचे, स्थायी मुनी उन्नत,
कीं ज्यांच्या खडकाळ काळहृदयीं राहे जितें अमृत,
रक्षाया शरणागता न चुकती होवो किती वादळ,
यांचा आश्रय उच्च शीतल नवें दे दुर्बळांना बळ,
हा हा ! ही प्रतिमाच केवळ, अता आहांत कोठे तुम्ही ?
कोठे मीहि अपात्र पुत्र ? पुरवीं का तूमचा हेतु मी ?
२३ सप्टेम्बर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP