तुटलेले दुवे - प्राणी कोण कुठील हा कुणिक...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
प्राणी कोण कुठील हा कुणिकडे ऊटीमधे चालला ?
बेटयाचा नुसता दिमाखच पहा. दारिद्य याला वरी,
श्रेष्ठाची न कुठे भलावण न वा आप्तत्व, ना चाकरी.
हा प्रेमाळ कवी तशांत, नकळे कैसा असावा भला ?
आहे प्रेमच एकला विषय तत्काव्यांत बोकाळला.
वाचा आणि पहा किती बहकली ती भावनावल्लरी,
सौन्दर्यावर सक्त सन्तत अशी ती कल्पना नाचरी,
ये विश्वास न - कालिदासहि असो - प्रेमी कवीचा मला.
वेडा जीव निसर्गभक्त असला घ्यावा कसा मन्दिरीं,
कोणा कानगुजेल काय ? न कळे कैसा करी यत्न हा,
प्रेमाचीहि विचित्र नीति म्हणती - आहे जरी रत्न हा
मेल्यानन्तर कीर्ति धारण करो याला सुखाने शिरीं.
ऐकालाहि न कां दिसे तरुण हा निर्भीड साधा गुणी ?
काव्यीं अमृत कां दिसे न ? गणिती रङगेल कां वारुणी ?
१६ सप्टेम्बर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP