तुटलेले दुवे - येथे मी शिकलों तसा विहरलो...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
येथे मी शिकलों तसा विहरलों निश्चिन्त शस्याङगणीं,
वेगें जात कसे मनोरथ तदा, लागे कशी लागणी.
विद्यार्थी किति शेकडों समवयी, ते स्नेह ते मत्सर,
गेला तो मधुकाल लोटुनि तया गेले किती वत्सर !
आता ओळखिचा क्कचित कुणि दिसे सन्मान्य अध्यापकीं
वस्तू याजड लाविती टक परी स्नेहाळ अद्याप की;
गेलें हाय कितीक तें बघुनिया वैषम्य वाटे मना;
आहे हें ऐरलें बघूनिहि परी हो गोड संवेदना.
नाना आठवणी फिरूनि पहिल्या काढूनि होतों श्रमी,
वाटे तोंच असे ऐथे अजुनिही हाबाल मी, मुक्त मी,
लोकांनी स्थळ हें जरी गजबजे ऐकान्त येथे मला,
भूताची सगळी प्रभावळ मला वाटूं न दे ऐकला.
ही शाळा, मम जन्मभूइ मज ही वाटे जणू माऊली
येथे सर्व समोष्णशीतल रुचे - तें ऐन, ही साऊली.
२३ मार्च १९३४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP