तुटलेले दुवे - लोण्ढा खालुनि ये वरी भरुन...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
लोण्ढा खालुनि ये वरी भरुनि तों जाऊ धुक्याने दरी,
जाऊ नागफणी बुडूनि तंव हा लागे दिसाया तळ;
घेती झेप घळींतुनी खळखळा फेसाळते ओहळ;
झाडी घुङगट घे, तृणाङगणिं परी नाचे हरित्सुन्दरी,
पानाआड खुले कचोरकलगी, जोमें चवेणी फुटे,
लाखो सूर्यफुलें ऊथे चिमुकलीं, हे किर्मिजी तेरडे,
हासे डोङगरभाग ऊन हसरें गाळीव जेव्हा पडे,
ओलें रान बघूनि शान्तिलहरी स्वान्तीं सुखाची कुठे.
तों जेऊ हिरिरी नवीन करुनी लाटेप्रमाणे घुकें.
ऊशा दोन धुक्यांत अन्तर पडे तें आमुचें जीवित.
होऊ अन्धुक ‘काल’ विस्मृतिमधे, नाही ‘उद्या’ माहित,
देऊ चञ्चल ‘आज’ सौख्य नव हें - होऊल का हें फुकें ?
आला योग कसा अकल्पित, असा येवो न येवो पुन्हा,
सौख्याची स्मृति ठेवितीलच परी घाटांतल्या या खुणा.
१६ सप्टेम्बर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP