तुटलेले दुवे - राङगेने किति शिस्तशीर पुढ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
राङगेने किति शिस्तशीर पुढुनी जाती स्वयंसेवक,
पोशाखी दिसती न केवळ, पहा झुन्जार हे वेचक.
यांचा निर्मम कर्मयोग भगवा येथे ऊभारी ध्वज.
साङगे मन्त्र शिलङगणांत “शरणं हिन्दुत्वमेकं व्रज”.
दावी हा गणवेष ऐक समता लोकांत जी ये नव,
येती भाव चम्बळूनि बघुनी ऊसें चमूवैभव,
अश्वारूढ कुणी पुढे मिरवतो अग्रेसर क्षत्रिय,
बोले तों कुणि, ‘भोसलेकुलज हा राष्ट्रीय धर्मप्रिय’.
सीमोल्लङघन हें असें नव पिढी आता कराया निघे,
राष्टद्दष्टि नवीन ठेवुनि पुन्हा स्वत्वास जिङकूनि घे,
या खान्द्यांवर शोभती पण अशा लाठयाच का आपणा ?
येतां तो क्षण, बन्दुकांस, समरीं देतील का सामना ?
मोठे पायिक शूर हे पण कुठे, त्या व्योमसञ्चारिणी ?
छातीचा तरि कोट भक्कम पुरा तो होऊं द्या या दिनीं.
२६ जुलै १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP