तुटलेले दुवे - “तो काव्यात्म खुळा पहा कव...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
“तो काव्यात्म खुळा पहा कवि अहो” ऊसें कुणी बोलतो.
आली पाहुनि मासिकांत कविता हेवाहि वाटे कुणा,
ऐकान्तांत कुठे रसज्ञ विरळा आनन्दुनी डोलतो.
टीकाकार कुणी दुरूनि मिळवी ऐकीव खाणाखुणा.
मीं ‘काव्यं यशसे’ म्हणूनि धरिली न्प्रही करीं लेखणी,
किंवा अर्थ हवा म्हणूनि नकली स्तोत्रें न मीं गाऊलीं,
साङगाया ऊपदेश ही न विदुषी - माझी कला देखणी,
प्रीतीची कविता कशास लिहिली ? कोणास ही वाहिली ?
काव्यीं भाव अनन्य झाकुनि पहा तूज्यापुढे ठेवितों.
वस्त्रें झाकुनिया ऊपायन जसें थोरापुढें ठेविती,
येती नित्य ऊपायनें तुज किती ! तू पाहशी देवि, तों
येती सेवक, यास नेऊनि कुठे कोठीमघे फेकिती.
माझें काय निवेदन ? क्षणच तू ल्यावे अलङकार गे,
साङगूं काय अता कशास " ऊथुनी जातों नमस्कार घे.
१८ मार्च १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP