मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
लोकांना दुरुनी दिसे कळस त...

तुटलेले दुवे - लोकांना दुरुनी दिसे कळस त...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


लोकांना दुरुनी दिसे कळस तो शोभे किती सुन्दर !
होती लुप्त परी किती दगड ते पायामधे नाहिसे !
अन भिन्तींतुनिही कितीक चिणले जाती पहा पत्थर,
त्यांना आवळुनी धरी पण चुना, कोणास तो ना दिसे.
राष्ट्राची चढती कमान असतां जी व्यक्ति येऊ शिरीं
वाटे ती किति दर्शनीय शिखरावाणी जनांना गुणें !
माजे वृत्ति फुटीर जों कळस तों राहील का मन्दिरीं ?
भिन्ती तैं फुगुनी चिरे निखळती. हो काय तेव्हा ऐणें ?
डोलारा कलतां तयास अपुला देऊनि टेका बळें
काही काळ तयास सावरुनिया तैसें ऊभें ठेवणें
हें कर्तव्य करी, महत्त्व न कुणा त्याच्या कृतीचें कळें.
काळें भङगुनि तो धुळींत पडतो की स्वीय वेडेपणें !
ती अव्यक्त जुटीर शक्ति नुरतां सारी निराशा तरी
राष्ट्रोद्धार करावयास झटती त्यांची कुणाला सरी ?

८ डिसेम्बर १९३७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP