तुटलेले दुवे - मृत्यूचें भय बाळगूनि गमते...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
मृत्यूचें भय बाळगूनि गमतें जीवन्त मेलों असें,
विन्चू पालिपुढे जसा अचल वा सापापुढे बेडुक,
रात्रीचे वर कोहिनूर दिसती नेत्रांस का कोळसे ?
बुद्धीलाहि असत्य सत्य पटतें. झालें कसें चेटुक;
नाही शाश्वत काळरात्र पण ही, ही दीर्घसूत्री तरी,
डोळे मीट, ऊषा मनांतच पहा आरक्त सोत्साह ती,
पक्ष्यांची किलबील ती हळुहळु येऊल कानांवरी,
नेत्रांतें ऊघडीं यदा गिरितरू तेजामधे नाहती.
य़ेऊं दे मरणास येऊल तदा, आधीच हें कां भय ?
येतां नीट समोर गाडुनि ऊभा राहूनि लावी टक,
नेत्रींचा पडतां स्फुलिङग यम तो होऊल रक्षामय,
कामाला शिव, अन्तकास असशी तू त्या परी अत्नक्र.
चित्तांतील भुतांस गाडुनि पहा रात्रींतही चारुता;
देवांनाहि अजिङक्य तू, मग भिशी दैत्यांस या कां वृथा ?
६ ऑक्टोबर १९२१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP