तुटलेले दुवे - देवा, जन्म दिला कशास्तव म...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
देवा, जन्म दिला कशास्तव महाराष्ट्रांत या रे मला !
कोठेही मज राष्ट्रबन्धु न दिसे, मी ऐकला, ऐकला !
प्राणी पुच्छविशाणहीनच असे मिथाभिमानी जन,
सारे शिष्ट कुटुम्बदासच ! महाराष्टीय कोणीच न.
मागो रावण भीक, (वन्द्यच सदा ती ब्रम्हादीक्षा जुनी !)
मुक्ताद्वार ऊथे, ऊदारपण हें गाजे अम्हां गान्जुनी.
ऐकामागुनि ऐक हाय परकी सत्तेस जातों वळी
बाकीचे म्हणतों. ऐरूंच पुरुनी, आऊं न आम्ही तळीं.
कोणीही सवता सुभाच अपुला स्थापावयाला बघे,
हें स्वान्त्र्यच ! तत्त्वमूढजनता त्याचा कसा जाब घे ?
चाले सङघटना अखण्डित महाराष्ट्घ्न लोकांमघे
आम्ही सर्व मुमुक्षु भाण्डुनि मरूं सद्धर्मनिष्ठामदें,
वैर्याने लचका अचानक महाराष्ट्रांतला तोडिला,
सारें शान्त ! न ऐकुं ये कुठुनि कां उच्छवासही सोडिला ?
२६ जून १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP