तुटलेले दुवे - होतों चाळित मासिकें तंव द...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
होतों चाळित मासिकें तंव दिसे छाया तुझी हासरी -
अन जाऊ हृदयांत होऊनि किती गे कालवाकालव !
पाहूनी छवि लोक बोलतिल. “ही भूशुक्रतारा खरी !"
कोणी चोरुनि चुम्बतीलहि घरीं, त्यांचा न हेचा लव.
तू आहेसच विश्वमोहक तशी ! शालीन तोरा किती !
हें लावण्य अवर्ण्य कां न ह्रदया देऊल आन्दोलन ?
कां वैषम्य हवें तुला जर कुणी हृत्सम्पुटीं राखिती,
घेती श्रीधर वा कलाधर कुणी पायीं तूझ्या लोळण ?
माझा प्रेमनिवेदनेंच सगळा हा घात केला पहा.
केलें तें नसतें तरी न जडती आजीव आशी व्यथा.
छायाचित्र गतस्मृतींत ऐठवी. देऊ मनस्ताप हा !
गेली मुक्ति समीपतेस मुकतां, गेलीच ती दिव्यता.
दुर्दैंवें निखळे दुवा पुनरपी तू जोडिशी न स्वता,
ही छाया विरहीं बसविली मोडूनि टाकी अता.
२६ नोव्हेम्बर १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP