तुटलेले दुवे - म्हातारे कवि सात पाहुनि ज...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
म्हातारे कवि सात पाहुनि जिला आनन्दुनी बोलले:
“प्रेमाचा अवतार भूवर नवा झाला असे या क्षणीं,
नेऊं तेथ ऊपायनें म्हणत की ‘ते स्वस्ति सुस्वागतम !”
ती का तू क्षितिजीं मदीय दिसशी चेतोहरे तारके ?
स्वर्गींची कविताच तू द्युतिमयी दूरस्थ हे देवते,
आत्म्याचें तव मञ्जुगान अथवा त्वदभावना - नर्तन
दोन्हीही मजला अगोचर, परी क्षीणांशु हा ऐवढा,
आधारास धरूनि तन्तु असला स्वर्गास येऊन मी ?
प्रेमक्रूस पहा कसा मिरवितों खान्द्यावरी मी सदा,
कोठे मार्ग ऊजू अरुन्द न कळे जो ने तुझ्या मन्दिरीं;
केव्हा “त्यागिशि काय तूहि मजला देवा ?” असें वाटतें,
हा क्षीणांशु तुझा अनर्थसमयीं तेव्हा मला धीर दे.
अंशु क्षीण परी पुरेल मज हा. तारे. रहा सुस्थित.
वाटे गे भय धूमकेतुपरि तू होशील अन्तर्हित.
१७ ऑगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP