तुटलेले दुवे - येथे गीत सुरेल कोण दुसरें...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
येथे गीत सुरेल कोण दुसरें गाणार ?- का थाम्बलें ?
होशी स्तब्ध भुलेल ऊकुनि कुणी या का खुळ्या भीतिने ?
चेडावें स्वरदेवतेस असल्या जी दीनवाणी, तिने ?
गा गा मुक्त मनें ! असे स्वर तुझे ऊन्चावले लाम्बले
की माझ्या प्रतिभेस पडख फुटुनी येतील त्यांच्या बलें.
तुझा कण्ठ मदीय काव्य मिळुनी रङगोत तीं प्रीतिने,
स्नेहाच्या स्वरसङगमांत वरुषें जावोत जेवी दिनें !
प्रीतीचें जर का प्रमोहसुख तें देवा, मला लाभलें. -
मार्गीं नि:स्वन अन्धकार सुचवी जाणें किती अन्तर,
आलाप स्मरणींच तो तरळुनी हेलाववी मानसा,
खान्तीं बाहिरल्यापरी लुकलुके ज्योतिष्मती राजसा -
देवी, व्यञ्जन मी स्वराविण तुझ्या होऊं कसा अक्षर ?
मागे मी बघतां ऊजेड अपुरा जो ये गवाक्षांतुनी
होऊ तोहि विलीन, काय गमते ही पुण्यरथ्या सुनी !
२४ जुलै १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP