तुटलेले दुवे - रथ्या स्वच्छ जलार्द्र, ही...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
रथ्या स्वच्छ जलार्द्र, हीं ऊपबनें, क्रीडाङगणें पाचवी,
हे प्रासाद विशाल रम्य, तिकडे ऊत्तुङ्ग घण्टाघर,
विद्यामन्दिर भव्य ‘गोलघुमटा’ हूनीहि जें सुन्दर,
येथे वास्तुकला सगर्व अपुलें माथें कसें ऊन्चवी,
मध्ये विस्तृत पाळ - बन्द सर हें शोभे जणू दर्पण,
तारेचे रमणीय पूल झुलते, काही दुजे प्रस्तरी,
रात्री वीज लखाखुनी चहुकडे चन्द्रप्रभा विस्तरी,
लाभे गावकर्यांस मादक ऊथे हें द्दष्टिसन्तर्पण.
येथे केवळ राजसेवकच जे श्रीमन्त गर्विष्ठ ते :
सारीं बाण्डगुळें ! स्वतन्त्र जन ते कोठे धनोत्पादक ?
धन्देवन्त कुबेर राष्ट्रिय अशा शक्तीस जे साधक ?
शेती ऊत्तम, कां बरें मग तिथें दारिद्य हें तिष्ठतें ?
छाती काढुनि चालतील कधि हे काबाडकष्टी जन ?
नाही रान ऊभें जितें, चहुकडे देखा सुकें ऊन्धन !
२२ मे १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP