तुटलेले दुवे - ओलावा लवही न ज्यात असलें ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
ओलावा लवही न ज्यात असलें हें पत्र माझ्यापुढे
पाहूनी मन कां पुन्हा हुरळते ? वेडें खरें बापुडें !
हें हस्ताक्षर गोल रेखिव ऊभें काढी जुनी ओळख,
हो आन्दोलित जीव मागुनि जसा कानीं तिच्या लोलक,
देखावा बदले - कुठे रण ? कुठे ती मर्मदाही झळ ?
सोन्याने खजुरी अलङकृत ऊथे, वाहे झरा निर्मळ;
गाऊ मञ्जुळ गीत बुल्बुल सुखी प्रच्छाय पर्णान्तरीं
अन दे दर्शन शाद्वलीं परिचिता नावेक ती सुन्दरी.
प्रीतीची पहिलीच ऊंर्मि, न बघे जी वर्ण वा सम्पदा,
प्रीती जी पहिली खुळावुनि नरा त्या पोचवी चित्पदा.
ती प्रीती जडली तेथेच जडली, अन्यत्र जाणें तिला
नाही शक्य असाच लेख विधिने आहे हृदीं टेविला.
कालानन्तर दीर्घ आलिस गडे सुस्वागतम या ऊथे !
मी प्रश्नोत्तर काय गे तुज करूं ? हे पत्रिके, स्वस्ति ते !
३ डिसेम्बर १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP