तुटलेले दुवे - “हा रस्त्यांत दिसे न तों ...

सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.


तुटलेले दुवे
“हा रस्त्यांत दिसे न तों पटपटा सम्भाषणें थाम्बती,
द्दष्टी यावर रोखिली प्रकटवी साशङक कौतूहल,
याची पाठ फिरे न तोंच ऊसळे हेटाळणीचें हसें,
मागूनी विषदिग्ध शब्द सुटती काळीज भेदावया.”
“याच्या निर्भय चारु गौर वदनीं शोबे विषादच्छटा !”
“जाऊ सिन्धुतटीं दुरी, कधि बसे निर्वृक्ष मोकावरी
आशुक्रास्त पहात ऊन्च गगनीं नक्षत्रदीपोत्सव,
किंवा नागर दीप हे विखुरले झाडींतुनी काजवे -”
“याला मीं पण ऐकदा बघितलें, रस्ता पुसे आन्धळा,
पैसा देऊनि त्यास हात धरुनी वाटेवरी लाविलें -”
“बाळांचें बहु वेड यास, तिकडे वाडींतलीं त्या मुलें
याला फारच चाहतात; गमतें दे नित्य खाऊ तयां.”
“वाटे पण्डित वा कुणास भटक्या वा प्रेममानी, कवी !-”
“हा श्रीमन्त नसे. कशी अधनता ही जीवनीं वीख वी !”

२४ मार्च १९२४

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:22.2800000