तुटलेले दुवे - जेव्हा लोक सुखासनीं पहुडत...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जेव्हा लोक सुखासनीं पहुडती तेव्हा कुणी ज्योतिषी
नेमें ळावुनि दूरदर्शि नयनीं आकाश शोधी निशीं,
ज्योतिर्जीवन जाणण्यांत रमतां चिन्ता स्वताची नुरे,
ज्ञानाचा ऐपयोग तो नच पुसे, त्या ज्ञानयात्रा पुरे.
रङगे भूवरतीच अन्य मनुजसृष्टीचिया शोधनीं.
राहे ज्यापरि पद्मपत्र ऐदकीं तैसाचही तो जनीं,
होवो राष्ट्रभविष्य रम्य म्हणुनी ज्ञानार्थ हा कष्टत
शोधूनी अवशेष, कल्पुनि करी हा मूर्त भूताप्रत,
तो जो भुवर राहुनीच विहए दूरस्थ तेजांमधी
त्याला लोक ऐदात्त ऐच्च गणिती, तो राहुं द्या त्या पदीं.
खालीं पाहत अस्थि शोधित फिरे नादांत सर्वत्र हा,
याला कोण गणी ऐदात्त ? म्हणती विक्षिप्त याला पहा.
घ्या याचे गुणकर्म नीट बघुनी, वन्दा निखन्दा पण
‘विद्यासेवक’ हाच आणिक खरा हा वैदिक ब्राम्हाण !
२८ मे १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP