तुटलेले दुवे - केला प्रश्न मुठींत जीव धर...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
केला प्रश्न मुठींत जीव धरुनी मागे तुला ऐकदा:
झालों ऊत्तर ऐकुनी न पुरता भग्नाश मी वाग्यते !
झालीं पांच अता तयास वरुषें, मी भोगितों आपदा
आता काय करूं तरी ? न हृदयीं बाणेच वैराग्य तें,
लक्ष्मी नित्य तुला प्रसन्न, नि गुणें तू शोभशी शारदा,
होशी पोक्त गभीर शान्त नि तुझी कीर्तीहि फैलावते,
माझें साहस अन्तरीं तडकलें, अद्दश्य बैसे गदा,
लाटांच्या पकडींत चित्त दुबळें भावार्त हेलावतें,
होतां भेट निघे कधी गुहकथा अन होय सम्भाषण,
पूर्वींचेंच दिसे अगत्य नयनीं प्रेमास जें चेतवी;
तू माज्यास्तव, मी तुझ्यास्तव जणू आलों जगीं आपण,
तू सडगीततरङिगणी तर तुझा सोत्कण्ठ मी गे कवी.
रङगे लज्जित वारुणी, न तिसरें माणसू माळावर,
तू तो प्रश्न विचार, सिद्धच असे ओठावरी ऊत्तर,
४ डिसेम्बर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP