तुटलेले दुवे - तूझी छत्रपते, अजूनि न कळे...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तूझी छत्रपते, अजूनि न कळे लोकोत्तर श्रेष्ठता,
देहाशी तुळिलें न हेम, दिधले स्पप्राण धर्मास तू !
तू केलास सजीव धर्म सहुनी प्राणान्त दुक्खें स्वता,
राजांतील दधीचि होऊनि कसा केलास आत्मक्रतू.
राजांचाच पराक्रमी सुत, महाराष्ट्रांत सम्राट पुढे -
प्रासादांत अजूनि वंशज तुझे सत्तासुखें भोगिती -
जें रक्षा तव रक्षितें स्थळ कुठे तें ना कळे बापुडें,
हें वृन्दावन सान भग्न तव का ? शम्भो ! अनास्था किती !
जेव्हा ती घटना अवर्ण्य घडली या पुणतीरावरी
भीमे, काय थरारलीस न हृदी, का तप्त झालीस न ?
केवी विस्मृति शान्तशीतल अशी तूझ्या मनाला वरी ?
क्रव्यादग्निच ही समाधि ऊठवी माझ्या मनीं भीषण,
वाया शोक नको, गुढयाच ऊभवा, तो काळ मेला जुना,
भस्मांतूनि ऊठूनि दिव्य पुरुषा मृत्युञ्जया, ये पुन्हा.
२६ मार्च १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP