तुटलेले दुवे - देशाच्या स्थितिचा विचार क...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
देशाच्या स्थितिचा विचार करितां मी मन्दिरासन्निध
आलों तों पडला मम श्रुतिपथीं गोङगाट तो तुम्बळ;
चाले गर्जुनि आरती, झणणती झान्जाहि नानाविध,
त्या नादांत मनास मङगल मिळे जुन्माद उत्छृङखल.
झालों खिन्नच मी; पुढे स्थळ दिसे तोण्डास गावाचिया
दे सर्कार जिथे स्वत: बनविली गाळीव लोकां सुरा;
गाती गर्जुनि लावणी कुणि तिथे ज्यांना सुरा ही प्रिया
जीवनन्मुक्त करी घडीभर तरी जी श्रान्त चिन्तातुरां.
हो दोन्हीहि सुरालयें, वरिवरी भासे जरी अन्तर,
घेती विस्मृतिची समाधिच ऐथे हे स्वार्थकष्टी जन
चिन्ता जो करि आपुलीच नच हो त्या साहय विश्वम्भर,
होती हे जन अन्धळे नि दुबळे की मानवी ऐन्धन ~
आत्मा हा बलहीनलभ्य नसतो साङगूनि गेले मुनी
अन लाभे बळ संहतींत, परि हें घ्यानीं धरावें कुणीं ?
९ डिसेम्बर १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP