तुटलेले दुवे - “गाणें एक तरी म्हणा कवि त...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
“गाणें एक तरी म्हणा कवि तुम्ही श्रीशारदाकिङकर !
प्रेमें मङगल चारु सत्य करितां गीतांत अन्वेषण,
विश्वालाच सहानुभूति तुमची दे निर्भरालिङगन,
द्रष्टे, प्रेषित पूज्यपादच तुम्ही की शब्दसृष्टीश्वर.”
“कोठे वैदिक सूक्तकार अथवा वाल्मीकि तो प्राञ्जळ
श्रेष्ठ व्यास, नि कालिदास कवि तो - ओजाळ ते कोयळ !
कोठे शाश्वत जान्हवी तर चतुर्मासी कुठे ओहळ ?
ही ऐशी स्तुति शान्ति दे न, ऊठवी चित्तामधे वादळ.
खाली दाट धुक्यांत कोकण बुडे, लोपे दरी खोल ती,
झाडी दाट कुठे ? तकाकित कुठे ती पोपटी मख्मल ?
वृष्टींतूनि गळे प्रकाश तिकडे सौवर्ण निष्कश्मल,
तान्हीं गोड विचित्र रानसुमनें वार्यासवें डोलती.
द्दश्यें हीं बघतां स्वत:च कविता होतां तुम्ही या क्षणीं -
शब्दांच्या जुळणींत काय ? कवनीं आधी हवी लागणी.”
१६ सप्टेम्बर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP